ही जागा नक्की कुणाची?

 Mallet Bunder
ही जागा नक्की कुणाची?

सँडहर्स्ट रोड - बाँम्बे पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी भाऊचा धक्का येथील मॅलेट बंदर भागात अनधिकृत बांधकामावर बुधवारी कारवाई केली. यासह 3 झोपड्यांवरसुद्धा कारवाई केली. सदर जागेवर हे अनधिकृतपणे बांधकाम कुणी केले याबाबत कोणतीच माहिती बीपीटी अधिकाऱ्यांनी दिली नाही. पण सदर जागा ही बीपीटी म्हणजेच बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. या वेळी अनधिकृत बांधकाम प्रभारी एम. एल. शर्मा हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

Loading Comments