मुंबईतील सुस्थितीतील रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे केलेल्यांवर बडगा

Mumbai

See all
मुंबई  -  

मुंबई - शहरातील रस्त्यांची स्थिती सर्वपरिचित आहे. मात्र कित्येक वेळा सुस्थिती असलेले रस्ते काहीही कारण दाखवून त्याची दुरुस्तीचा निर्णय घेऊन अधिकारी, अभियंते, कंत्राटदार मिळून लूट करत होते. या प्रकरणाबद्दल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, भाजपाचे आमदार आशिष शेलार, यांनी प्रश्न उपस्थित केले. तर भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी आयुक्तांकडून चौकशीसाठी एसआयटी नेमावी अशी मागणी केली. शहरातल्या सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबतचा निर्णय घेऊन गैरव्यवहार केलेल्या संबंधित अभियंते, कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांमार्फत चौकशी सध्या सुरू आहे. निकषात बसत नसतानाही कामे केली असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही रणजीत पाटील यांनी दिले. 2016 पूर्वीच्या 250 रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी करण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या संबंधित कंत्राटदार, अभियंता आणि कर्मचारी यांना अटकही करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.