Advertisement

मुंबईतल्या काही भागात पुन्हा वीजपुरवठा खंडित, 'हे' आहे कारण

मुंबई आणि उपनगरात दुसऱ्या दिवशीही वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

मुंबईतल्या काही भागात पुन्हा वीजपुरवठा खंडित, 'हे' आहे कारण
(Representational Image)
SHARES

मुंबई आणि उपनगरात दुसऱ्या दिवशीही वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. खारमध्ये आज, २७ एप्रिल रोजी सकाळी दुहेरी केबल बिघाडामुळे खार आणि वांद्रे दरम्यानच्या नऊ सबस्टेशनवर परिणाम झाला. त्यापैकी सहा सबस्टेशन एका तासाच्या आत पूर्ववत करण्यात आले. आज पहाटे ४ वाजता वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, उर्वरित तीन सबस्टेशनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईच्या सूत्रांनी सांगितले आणि ते काही वेळात पूर्ववत केले जातील.

दुसरीकडे, नवी मुंबई आणि पनवेलमधील अनेक नागरिकांनी मंगळवार, २६ एप्रिल रोजी रात्रभर वीज खंडित झाल्याच्या तक्रारी केल्या.

आदल्या दिवशी, कळवा पडघा ४०० केव्ही ट्रान्समिशन लाइन सुमारे १०.१५ वाजता ट्रिप झाली. त्यामुळे मुंबईतील काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचं वृत्त आहे. यात दादर, माहीम, वांद्रे, सांताक्रूझ आणि महालक्ष्मी या इतर भागांचा समावेश आहे.

उन्हाळ्यात यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दुसरीकडे, ठाणे आणि डोंबिवलीच्या काही भागातील रहिवाशांनीही त्यांच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार केली आहे.

ट्रान्समिशन लाईन ट्रिपिंगमुळे, ठाणे येथून २१० मेगावॅट आणि मुलुंड येथे ४५ मेगावॅट भारनियमन करण्यात आले आहे.

लोडशेडिंगचा भाग म्हणून मुंबईला सामान्यत: कोणत्याही अनिवार्य वीज कपातीचा सामना करावा लागत नाही, परंतु ऑक्टोबर २०२० मध्ये १८ तासांपर्यंतच्या व्यत्ययासह भूतकाळात अडचणींचा सामना करावा लागला आहे.



हेही वाचा

मॉल्स, सिनेमा हॉलमध्ये मास्क बंधनकारक करण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा