Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईत सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी
SHARES

मुंबईत सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने (mumbai rains) हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. शिवाय, सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या पावसामुळं अनेक त्रासांना समोर जावे लागत आहे.

गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती. त्यामुळं प्रचंड उकाडा वाढला आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं दिलासा दिला आहे.

भारतीय हवामान खात्यानं (IMD) खुलासा केला आहे की, मुंबईत यंदा जूनमध्ये ९६१.४ मिमी पाऊस पडला. गेल्या महिन्याच्या दशकात हा तिसरा सर्वाधिक पाऊस आहे. यावर्षी जून महिन्यात पावसाची नोंद जून महिन्यात झालेल्या सरासरीपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त होती.

जून २०२१ मध्ये ९६१.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर महिन्यातील आयएमडीचा सरासरी ५०५ मिमी पाऊस पडला. आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, जून महिन्यात अर्धाहून अधिक पाऊस ८ ते १२ जून दरम्यान झाला होता. तर शहरात ९ ते १० जून रोजी २३१.३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा