Advertisement

ऐन थंडीत मुंबईत पाऊस


ऐन थंडीत मुंबईत पाऊस
SHARES

दिवाळीनंतर मुंबईसह राज्यातील नागरिकांना थंडीची चाहूल लागली. राज्यातल्या अनेक भागांत पारा घसरायला सुरुवात झाली होता. मात्र, शुक्रवारी अचानक मुंबईत पावसानं हजेरी लावली. शुक्रवारी पडत असलेला पाऊस शनिवारी देखील कायम आहे. मुंबईच्या अनेक भागात रिमझिम पाऊस पडत आहे.

शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेनं जाणार आहे. त्यामुळं आपल्याकडचे वातावरण ढगाळ स्वरुपाचं आहे.

येत्या १ ते २ दिवसांत हे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. मुंबईसह कोकणातही सकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा