Advertisement

मुसळधार पावसामुळं हिंदमाता परिसरात साचलं पाणी


मुसळधार पावसामुळं हिंदमाता परिसरात साचलं पाणी
SHARES

मुंबईत मंगळवारी सकाळी हजेरी लावलेल्या पावसानं दुपारी चांगलाच जोर धरला आहे. मागील ३ तासांपासून पडत असलेल्या पावसामुळं मुंबईच्या सखल भागांच पाणी साचलं आहे. मुंबईचं पाणी साचण्याची महचत्वाचं ठिकाण म्हणजे परळ येथील हिंदमाता परिसर. या हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. पाणी साचल्यानं सर्वच रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला आहे. 

मुसळधार पाऊस झाला की मुंबईची तुंबई होते, त्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. मुंबईच्या दादर, परळ, लालबाग, कुर्ला, सायन, माटुंगा, अंधेरी, मालाड, परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. गुडघाभर पाणी साचल्यानं दादर येथील प्लाझा ते दादर टी.टी. परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.


पाणी साचल्यानं चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान, हिंदमाता परिसरात महापलिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावले आहेत. तसंच, इतर पाणी साचलेल्या ठिकाणी देखील लावले आहेत. दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईत पाणी साचतं. त्यामुळं पावसाळा पूर्व कामं पुर्ण होत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी अशी परिस्थिती कशी निर्माण होते असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं तलाव क्षेत्रात अधिक पाऊस झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा