मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वेवर कोणताही परिणाम नाही

मुंबईत दक्षिण मुंबईसह माटुंगा, दादर, वरळी आणि लालबागमध्ये पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वेवर कोणताही परिणाम नाही
SHARES

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत दक्षिण मुंबईसह माटुंगा, दादर, वरळी आणि लालबागमध्ये पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. तर, पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली असून ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नवी मुंबई परिसरातही जोरदार पाऊस कोसळत आहे.

अतिमुसळधार पाऊस

येत्या २४ तासांमध्ये मुंबई, कोकणासह गोव्यातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यासोबत रायगड आणि पुणे जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळलेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

समुद्रात जाणं टाळा

मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता मुंबईकरांनी समुद्रात जाणं टाळावं, तसेच ज्या ठिकाणी पाणी भरलं असेल अशा ठिकाणीही जाणं टाळावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले आहे. या पावसामुळं मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरूळीत सुरू आहे.हेही वाचा -

लोहारचाळ परिसरात ४ मजली इमारत कोसळली

काॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणासंबंधित विषय