Advertisement

मुंबईत पावसाची विजांच्या कडकडाटासह हजेरी


मुंबईत पावसाची विजांच्या कडकडाटासह हजेरी
SHARES

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं गुरूवारी विजांच्या कडकडासह हजेरी लावत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मागील अनेक दिवस पावसानं विश्रांती घेतली होती. त्यामुळं उकाड्यात प्रचंड वाढ होती. या उकाड्यामुळं मुंबईकरांना पावसाची आतुरता होती. अखेर पावसानं हजेरी लावत उकाड्यातून थोडीसा का होईना दिलासा दिला.


मुंबईत पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होतं. या पावसामुळं मुंबईतीलसखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, लालबाग, परळ, अंधेरी, मालाड, कुर्ला या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. मात्र, केवळ ढगाळ वातावरण पण पाऊस नाही अशी परिस्थिती मुंबईत आहे.

दरवर्षी मुंबईत जास्तीता पाऊस पडल्यावर अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचतं. पाणी साचल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावाल लागतो. दरम्यान, मुंबईत पाणी साचण्याची ठिकाणं लक्षात घेत महापालिकेनं दक्षता घेतली आहे. पावसाळ्यापूर्वीची काम अद्याप अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाही त्यामुळं पाणी साचण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा