Advertisement

'या' तलावक्षेत्रांमध्ये १६४ ते २६४ मि.मी. पावसाची नोंद

भातसा तलाव हे मुंबईकरांची तहान भागविण्यात महत्त्वाचं आहे.

'या' तलावक्षेत्रांमध्ये १६४ ते २६४ मि.मी. पावसाची नोंद
SHARES

मुंबईत पवासानं हजेरी लवाली असून अनेक भाग जलमय झाला आहे. त्याचप्रमाणं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रातही पावसानं चांगली हजेरी लावली. आतापर्यंत तलावक्षेत्रांमध्ये १६४ ते २६४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, भातसा धरणक्षेत्रात २६४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भातसा तलाव हे  मुंबईकरांची तहान भागविण्यात महत्त्वाचं आहे.

गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळं आजही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १ लाख ७५ हजार ७९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तसंच, हा पाणीसाठा आणखी पुढचे ५० दिवस मुंबईकरांना हे पुरेल इतका आहे. अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, विहार व तुळशी या तलावात पावसाने हजेरी लावली असून आतापर्यंत तलावक्षेत्रांमध्ये १६४ ते २६४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दररोज ५०० ते ६०० दशलक्ष लिटर पाणी बचत कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन आणि संचारबंदी होती. अलीकडेच ती अंशत: शिथिल करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात तरणतलाव, पंचतारांकित हॉटेल, इमारत बांधकाम, खासगी कंपन्यांची कार्यालये बंद होती. केवळ सरकारी कार्यालयांमध्ये मर्यादित संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. ही बाब लक्षात घेता प्रतिदिन ५०० ते ६०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.


तलाव क्षेत्र 
पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा 
२२७
तानसा 
१८४
मोडकसागर 
२०१
भातसा 
२६४
मध्य वैतरणा 
२१६
विहार 
१९५
तुळशी 
१६४



 हेही वाचा -

पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा