Advertisement

घाटकोपरमध्ये घराची भिंत पडून एकाचा मृत्यू


घाटकोपरमध्ये घराची भिंत पडून एकाचा मृत्यू
SHARES

घाटकोपर पश्चिममधल्या असल्फा व्हीलेज परिसरात घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. यातील दोघांना उपचार करून सोडून देण्यात आले. एकावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटकोपर पश्चिम इथल्या असल्फामधल्या आंबेडकर नगरजवळ मंगळवारी उत्तर रात्री सव्वा दोन वाजता एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रामेश्र्वर तिवारी (45) असे मृतकाचे नाव आहे. राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले होते. त्यासर्वांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोघांना किरकोळ मार लागल्यामुळे उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर एका व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा