Advertisement

मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली ‘तुंबई, रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम

मुसळधार पावसाचा परिणाम रस्ते आणि रेलिवे वाहतुकिवरही झाला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली ‘तुंबई, रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम
SHARES

मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस (Mumbai Rains) कोसळतोय. रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळतंय. दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील धुवाधार पाऊस बरसतोय.

दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल इथं सखल भागांमध्ये पाणी साचायला (waterlogging) सुरुवात झाली आहे. दीड ते दोन फूटांपर्यंत अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसानं मात्र चांगलीच तारांबळ उडवली.

मुसळधार पावसाचा परिणाम रस्ते (BEST Service) वाहतुकीवरही झाला आहे. सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. कुर्ल्यामधील लाल बहादुर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील शितल सिनेमाजवळ, शीवमधील रोड नंबर २४, साईनाथ सबवे, चेंबूर फाटक, मलीन सबवे, अंधेरी बाजारपेठ, अंधेरी सबवे, गांधी मार्केट, हिंदमाता, आरसीएफ कॉलनी, वडाळा ब्रीजजवळ रस्त्यांवर पाणी साचल्यानं बेस्ट बसेसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मध्य तसंच हार्बर मार्गावरील रेल्वे (Train Service) सेवा ठप्प झाली आहे. कुर्ला- विद्याविहारदरम्यान ट्रॅक्सवर पाणी साचल्यानं वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीरानं सुरू आहे. कुर्ला-विद्याविहारदरम्यानची स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय. हार्बर मार्गावरील वाहतूकही २०-२५ मिनिटं उशीरानं होत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हार्बर मार्गावरील वाहतूक उशीरानं असली तरी सुरळीत सुरू असल्याचं म्हटलं आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये शहरात आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, १६ ते १९ जुलै या काळात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शुक्रवारी मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तो उत्तरेकडे सरकल्यास राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेनुसार, दक्षिण छत्तीसगड आणि पूर्व विदर्भावर चक्रीय चक्रवात स्थिती आहे. परिणामी राज्यात १६ ते १९ जुलै या काळात कोकण किनाऱ्यावर ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होईल.हेही वाचा

पर्यावरण रक्षणासाठी मुंबई उच्चन्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, कामकाजासाठी वापरणार 'हे' कागद

शहरांतील जुने वृक्ष होणार ‘हेरिटेज ट्री’, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा