Advertisement

राज ठाकरेंचा दावा खरा ठरला..वाढत्या लोंढ्यांच्या यादीत मुंबईचाही समावेश!


राज ठाकरेंचा दावा खरा ठरला..वाढत्या लोंढ्यांच्या यादीत मुंबईचाही समावेश!
SHARES

मुंबईमध्ये वाढणारी गर्दी ही परप्रांतीय लोंढ्यांमुळे होते असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा केला आहे. राज ठाकरेंचा हाच दावा खरा ठरला आहे.


पहिल्या दहा शहरांत मुंबईचाही समावेश

जगातील वेगाने वाढणाऱ्या 100 शहरांमध्ये प्रचंड स्थलांतर होत असून, या यादीत तब्बल 25 शहरं भारतातील आहेत. या शहरांच्या यादीत, पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईचा देखील समावेश आहे. 1991-2001 च्या तुलनेत 2001-11 दरम्यान भारतातील स्थलांतराचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगभरातील शहरांत वाढणाऱ्या लोंढ्यांबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.


स्थलांतरात बिहार पहिल्या क्रमांकावर

सर्वाधिक स्थलांतर करणारं राज्य म्हणून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारमधील गरीबी, बेरोजगारी यामुळे बिहारी जनता अन्य राज्यात स्थलांतर करत आहे. पुणे आणि सुरत ही आशिया विभागात सर्वाधिक प्रभावित शहरं म्हणून उदयास आली आहेत. आशियातील प्रभावित शहरांमध्ये पुणे आणि सूरतसह चीनमधील ग्वांगझऊ आणि फिलिपाईन्समधील दवाव यांचा समावेश आहे. बिहारमधील लोंढे मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक राज्यांत जात आहेत. बेरोजगारी, गरीबी ही त्याची प्रमुख कारणं आहेत. धक्कादायक म्हणजे बिहारचं दरडोई उत्पन्न हे सोमालियासारख्या गरीब देशाएवढं म्हणजेच वार्षिक 33 हजार रुपये इतकं आहे.

दुसरीकडे स्थलांतर न करणाऱ्यांच्या यादीत केरळचा नंबर लागतो. केरळचं दरडोई उत्पन्न हे बिहारच्या चौपट म्हणजेच सुमारे 1 लाख 52 हजारांच्या घरात आहे. त्या तुलनेत जन्मदराचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे केरळमधून बाहेरच्या राज्यात स्थलांतर होण्याचं प्रमाण कमी आहे. बिहारमध्ये जन्मदराचं प्रमाणही प्रचंड आहे, त्यामुळे उत्पन्न आणि त्यावर अवलंबून असलेलं कुटुंब यांतील तफावत खूप आहे.



हेही वाचा - 

'वाढते लोंढे थांबत नाहीत, तोपर्यंत मुंबईचा विकास नाही' - राज ठाकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा