Advertisement

'वाढते लोंढे थांबत नाहीत, तोपर्यंत मुंबईचा विकास नाही' - राज ठाकरे


SHARES

मुंबईवर आदळणारे लोंढे जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत मुंबईचा विकास होणार नाही. तसेच मुंबई महापालिका, 'एमएमआरडीएस'सह मुंबईच्या विकासाची जबाबदारी असलेल्या प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा कमालीचा अभाव आहे, त्यामुळेच मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ब्राम्हण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या ९२व्या वर्षानिमित्त राज यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज यांनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत परखड मते व्यक्त केली.

मुंबईत सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामावर टीका करत नवीन सेवा पुरवण्याच्या नावाखाली आहे त्या सेवाही बिघडत चालल्याचे सांगून राज त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या.

मुंबईत किमान ८ ते ९ प्राधिकरणे काम करतात. महापालिककडे वर्षानुवर्षे त्याच तक्रारी येतात. पण सुधारणा होत नही. केवळ टक्क्यांचे राजकारण. मी जर या कंत्राटदारांकडून नाशिकमध्ये चांगली कामे करून घेऊन शकतो, तर मुंबईमध्ये याच कंत्राटदारांकडून चांगली कामे का करवून घेतली जात नाहीत. यामागचे स्पष्ट कारण म्हणजे टक्क्यांच्या राजकारणामुळे त्यांना चांगले कामच करता येत नाही, असे राज यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत'चा नारा दिला आहे. परंतु खरी स्वच्छता महापालिका व राज्य सरकारमध्ये करायला पाहिजे. या दोन ठिकाणी स्वच्छता झाली तर रस्त्यावरही साफसफाई करायची गरज नाही. आज केवळ मुंबई महापालिकेविरोधातच आपण बोलतोय. पण एमएमआरडीए, म्हाडासह इतर प्राधिकरणांना कोण विचारणा? विलासराव मुख्यमंत्री असल्यापासून मी सांगत आलोय. आजवर महापालिकेसोबत सर्व प्राधिकरणांची बैठकच झालेली नाही. या समन्वय समितीचे अध्यक्ष हे महापौर आहेत. पण कोणात काय समन्वयच नाही, अशीही खंत राज यांनी व्यक्त केली.

मेट्रो प्रकल्प कोणासाठी होतोय? मुंबईकरांसाठी की बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यासाठी? आज पिढ्यानपिढया हे लोक शिवाजीपार्क, माहीम, गिरगावमध्ये राहत आहेत. पण त्यांना कधीही अशा सुविधांची गरज जाणवली नाही. ज्या गोष्टीची गरज नाही त्यात भर पाडून एकेक गोष्टी का वाढवतोय, असा सवालही त्यांनी केला. आजर मेट्रोवर जो खर्च केला जातोय तो रेल्वेवर का केला जात नाही? रेल्वेकडे जागा आहे. पण रेल्वेचा विकास नाही करायचा.

दोन्ही भाऊ एकत्र येणार का या ? प्रश्नावर मात्र, त्यांनी परमेश्वरालाच ठाऊक, असे सांगत आपला कुणीही 'बिग ब्रदर' नसल्याचे स्पष्ट केले.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा