मुंबईतली गर्दी जगात दुसऱ्या क्रमांकाची

 Mumbai
मुंबईतली गर्दी जगात दुसऱ्या क्रमांकाची
Mumbai  -  

जेथे गर्दी नाही, असे भारतातले कुठलेही शहर नसेल. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गर्दीची तुलनाच करायला नको. मात्र 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' (डब्ल्यूईएफ) ने संयुक्त राष्ट्राच्या निवासी आकडेवारीच्या आधारावर जगातील सर्वाधिक गर्दी असलेल्या शहरांची यादी नुकतीच सादर केली आहे. या यादीत बांग्लादेशातील ढाका हे शहर पहिल्या तर मुंबई दुसऱ्या स्थानी आहे.

लोकसंख्येच्या घनत्वाच्या आधारे ही यादी काढण्यात आली आहे. ढाक्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 44 हजार 500 लोकं राहतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक असल्याने ढाक्याला पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. तर मुंबईत प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 31 हजार 700 लोकं वास्तव्यास असल्याने मुंबई या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भारतातील आणखी एक शहर 'कोटा' या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. कोटामध्ये प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 12 हजार 100 लोकं राहतात.

अशी आहे यादी-

'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या या यादीत कोलंबिया तिसऱ्या स्थानी आहे. या शहरात प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 19 हजार 700 लोकं राहतात. या यादीत फिलीपाईन्सचे मनिला शहर (14,800) चौथ्या, मोरक्कोचे कॅसाब्लँका (14,200) पाचव्या, नायजेरीयाचे लागोस (13,300) सहाव्या, सिंगापूर (10,200) आठव्या आणि इंडोनेशियाचे जकार्ता (9,600) शहर नवव्या स्थानी आहे.

Loading Comments