Advertisement

मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक रस्ते, स्टेशन जलमय

हिंदमाता, लालबाग, अंधेरी, मालाड, बोरिवली, कुर्ला, माटुंगा या भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक रस्ते, स्टेशन जलमय
SHARES

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसानं रात्रभर हजेरी लावल्यानं अनेक भागांत गुडघा भर पाणी साचलं आहे. त्याशिवाय, मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची माहिती समोर येत आहे. तसंच हिंदमाता, लालबाग, अंधेरी, मालाड, बोरिवली, कुर्ला, माटुंगा या भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

रस्त्यावर पाणी सचल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. त्याशिवाय, रेल्वे रुळावर पाणी सचल्यानं लोकल वाहतुकही खोळंबली आहे. दरम्याम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी असली तरी त्रासात कमी नाही.

मुंबई शहर व उपनगरांत मंगळवारी दिवसभर हलका पाऊस होता. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे ३ तास सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी भरले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा