Advertisement

यंदा दिवाळीत मागील १५ वर्षांतील सगळ्यात कमी ध्वनी प्रदूषण

यंदा फटाक्यांच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची सर्वात निचांकी नोंद झाली आहे.

यंदा दिवाळीत मागील १५ वर्षांतील सगळ्यात कमी ध्वनी प्रदूषण
SHARES

मुंबईत दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. दरवर्षी अधिक फटाके फोडल्यानं प्रदुषण वाढतं. परंतू, यंदा कोरोनामुळं शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील १५ वर्षातील सर्वांत निचांकी ध्वनीप्रदुषण नोंदवलं गेलं आहे. यंदाच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषण रोखण्याच्या हेतूनं मुंबई महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास प्रतिबंध केला होता. त्याचाच परिणाम म्हणून यंदा फटाक्यांच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची सर्वात निचांकी नोंद झाली आहे. 

आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं याबाबत अहवाल तयार केला आहे. यंदाच्या दिवाळीत मुंबई महापालिकेनं फटाके उडवण्याबाबत कडक निर्बंध घातल्यानं कमी डेसिबलची नोंद झाली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये ध्वनी प्रदुषणाबाबत जागृती होत आहे. आवाज फाउंडेशनच्या माहितीनुसार, शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंतच्या शहरातील आवाजाची पातळी मोजण्यात आली. 

फटाके वाजण्याच्या वेळमर्यादेपर्यंत म्हणजेच रात्री १० वाजेपर्यंत शहरातील शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात १०५.५ डेसिबल ध्वनीची नोंद झाली. यापूर्वी मुंबईत दिवाळीच्या दिवशी २०१९ मध्ये याची ११२.३ डेसिबल, २०१८मध्ये ११४.१ डेसिबल, २०१७ मध्ये ११७.८ डेसिबल ध्वनीची नोंद झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळं ध्वनी आणि हवा प्रदुषण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेनं शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास मनाई केली होती. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा