Advertisement

विसर्जन मिरवणुकीत डेसिबलच्या काट्यानं ओलांडली शंभरी


विसर्जन मिरवणुकीत डेसिबलच्या काट्यानं ओलांडली शंभरी
SHARES

सर्वोच्च न्यायालयानं डीजेला बंदी घालूनही मुंबईत मंगळवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डेसिबलच्या काट्यानं शंभरी ओलांडल्याचं आवाज फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाला लाऊडस्पीकर आणि ढोल, ताशांच्या गजरात निरोप दिला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी आवाजानं १०० पेक्षा जास्त डेसिबलची पातळी ओलांडली. मनुष्य केवळ ८५ डेसिबल एवढाच आवाज सहन करु शकतो. त्यापेक्षा आवाज जास्त काळ सहन केल्यावर त्याचा आरोग्यावर वितरीत परिणाम होतो. त्यामुळं चिडचिड होणं, डोकेदुखी जाणवू लागतं, असं आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितलं.


रुग्णालय परिसरातही पातळी ओलांडली

सांताक्रूझ येथील आशा पारेख रुग्णालय परिसरात विसर्जन मिरवणुकांदरम्यान आवाज ११२ डेसिबलपेक्षा जास्त होता. ढोल, लाऊडस्पीकर आणि घंटा यांचा हा आवाज एवढा असल्याचं नमूद करण्यात आलं.

वरळीतील पोदार रुग्णालय परिसरात १०१.२ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. तसंच ग्रँटरोड येथील ब्रीच कँडी रुग्णालयाजवळ मिरवणुकांदरम्यान ९९.८ डेसिबल एवढा आवाज नोंदवण्यात आला.



सर्वात जास्त आवाज येथे

सांताक्रूझ पोलीस स्टेशनसमोरील मिरवणुकीत सर्वांत जास्त ११९.८ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. या मिरवणुकीत ढोल-ताशांसह हातोडीच्या साहाय्याने घंटा वाजविली जात होती.


गणपती विसर्जनादरम्यान आवाजाची नोंद पुढीलप्रमाणे :


वेळ (रात्री)
ठिकाण
आवाज (डेसिबल)
वाद्य
8.03 वा.
सांताक्रूझ
119.08
ढोल, ताशे, घंटा
8.15 वा.
लिकिंग रोड
112.04
ढोल, फटाके, स्पीकर
8.25 वा.
एस. व्ही. रोड, विलेपार्ले
105.9
डी.जे. बॅन्जो, फटाके
8.42 वा.
पारेख रुग्णालय
112
ढोल, लाऊडस्पीकर, घंटा
8.52 वा.
सांताक्रूझ
105
फटाके, डी.जे., ढोल-ताशे
9.02 वा.
एस.व्ही.रोड, खार
103.9
ढोल-ताशे, लाऊडस्पीकर
9.12 वा.
शीतलादेवी, माटुंगा
102
फटाके, स्पीकर, बॅन्जो
9.14 वा.
माटुंगा
101
फटाके
9.26 वा.
सेंच्युरी बाजार
102
ढोल-ताशे, लाऊडस्पीकर
9.34 वा.
पोदार रुग्णालय
101.2
डी.जे.
9.52 वा.
लव्ह प्रोव्ह
106
लाऊडस्पीकर
10.10 वा.
ब्रीच कॅन्डी रुग्णालय
99.9
ढोल-ताशे, स्पीकर
10.18 वा.
पेडर रोड
106.6
ढोल-ताशे, डी.जे.
10.33 वा.
चर्चगेट
101.0
ढोल-ताशे, घंटा
10.40 वा.
सचिवालय जिमखाना
103.1
ढोल-ताशे
10.42 वा.
कफ परेड
108.2
डी.जे.
11.21 वा.
बदामवाडी
116.0
डी.जे., लाऊडस्पीकर
12.43 वा.
बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल
110.1
ढोल-ताशे, लाऊडस्पीकर
12.48 वा. (दु)
लालबाग
113.1
लाऊडस्पीकर


   
   


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


   
   

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा