Advertisement

मुंबईत 6 तासात 74 मिमी पावसाची नोंद

महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पडला इतका पाऊस

मुंबईत 6 तासात 74 मिमी पावसाची नोंद
SHARES

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने (RMC) बुधवार, 28 जून रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 या दरम्यान अवघ्या सहा तासांत 74 मिमी पावसाची नोंद केली आहे. जून महिन्याची सुरुवात फारशी चांगली नसली तरी, गेल्या काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली. 

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात नोंदलेला पाऊस (सें.मी.)

सांताक्रूझ – १२

कुलाबा - १५

पालघर - २५

वाडा - १९

डहाणू - 18

भिवंडी - १८

उल्हासनगर - १७

अंबरनाथ - १६

वसई - १५

मुरुड - 14

उरण - 14

शहापूर - 14

देवगड - १२

इगतपुरी - १६

महाबळेश्वर – ११

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत असून येत्या काही दिवसांतही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. सहा जिल्ह्यांमध्ये ठाणे, रायगड, पालघर (मुंबईला लागून असलेले तीनही), रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक यांचा समावेश आहे. याशिवाय काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तथापि, मुंबईत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून शुक्रवार ३० जूनपर्यंत शहरात अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

गुरुवारी मुंबईत कसे असेल पावसाचे स्वरूप? जाणून घ्या IMD चे अपडेट

पावसामुळे झाड पडल्याने भायखळ्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा