Advertisement

चिंतादायक! मुंबईत कोविडच्या नवीन वेरिएंटचे 21 रुग्ण

मुंबईत जेएन-1 व्हेरियंटचा धोका वाढला आहे.

चिंतादायक! मुंबईत कोविडच्या नवीन वेरिएंटचे 21 रुग्ण
SHARES

ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन-1 व्हेरियंटचे तब्बल 22 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने ३४ कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले होते. त्यात 22 नवीन जेएन-1 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत, तर राज्यात जेएन व्हेरियंटचे 250 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत जेएन-1 व्हेरियंटचा धोका वाढला आहे.

गेली तीन वर्षे कोरोनाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांवर ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन व्हेरियंटचे संकट ओढावले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांनंतर अखेर जेएन-1 व्हेरियंटचा मुंबईतही शिरकाव झाला आहे. त्यात 22 रुग्णांना या नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे सर्व रुग्ण जिनोम सिक्वेंसिंगमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांसह राज्यातील या नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या 250 वर पोहोचली आहे.

मुंबईत आढळलेल्या 22 पैकी दोन नमुने मुंबई बाहेरील असून एक सॅम्पल ड्युप्लिकेट असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले, तर उर्वरित 19 रुग्णांना सौम्य लक्षण असून यातील दोघेजण सहव्याधी असलेले रुग्ण आहेत. 

सर्व रुग्ण बरे असून त्यांची प्रकृती स्थिर आहेत. यातील बहुतांश रुग्णांची टेस्ट खासगी प्रयोगशाळे करण्यात आली. या 19 पैकी 8 महिला 11 पुरुष असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील जेएन-1 व्हेरियंट रुग्णसंख्या तब्बल 250 वर पोहचली असून सोमवारी एका दिवसात 111 एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली.

रविवारपर्यंत 139 एवढे जेएन-1 व्हेरियंट रुग्णांची नोंद होती. सौम्य लक्षणांचा मानला जाणाऱ्या या रुग्णांची संख्या मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या नोंदणीतून समोर आले आहे.

जेएन-१ व्हेरियंट रुग्णसंख्या जिल्हानिहाय पाहिल्यास पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून पुणे 150, नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली 7, ठाणे 7, जळगाव 4, अहमदनगर, बीड प्रत्येकी 3, तर छ. संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक आणि धाराशिव प्रत्येकी 2, तसेच अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी 1 अशी नोंद झाली आहे.



हेही वाचा

केईएम रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण सुविधा पुन्हा सुरू होणार

महाराष्ट्रात कोविडच्या JN.1 रुग्णांमध्ये वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा