मुंबई उपनगरातील मतदार सव्वा दोन लाखांनी वाढले

  Pali Hill
  मुंबई उपनगरातील मतदार सव्वा दोन लाखांनी वाढले
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई उपनगरातील मतदारांची संख्या 2 लाख 26 हजार 768 नं वाढलीय. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला ही माहिती दिली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला होता. मतदार यादीत दोनदा नोंदणी असलेल्यांची नावं वगळण्यात आली आहेत. तर बोगस मतदारांनाही वगळण्यात आलं आहे. तर नव्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. त्यामुळे नव्या मतदारांची संख्या 2 लाख 26 हजार 768 ने वाढली आहे. आता उपनगरातील मतदारांची एकूण संख्या 68 लाख, 43 हजार 520 इतकी झाल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.