Advertisement

मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येलो अलर्ट जारी केलं आहे.

मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
(File Image)
SHARES

मुंबईत बुधवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्यानुसार, पुढचे ४८ तास मुंबई आणि उपनगारत मुसळधार पाऊस पडणार आहे.

सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसंच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य- उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त, मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गुरूवार, २ डिसेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ / सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

याशिवाय शनिवार आणि रविवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणां व्यतिरिक्त त्यांनी पुणे, रायगड, नाशिक, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

IMD नं मच्छीमारांना तसंच महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छिमारांना पुढील ५ दिवसांसाठी इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबईत बुधवारी, डिसेंबर रोजी किमान तापमानात किंचित वाढ झाली, IMD सांताक्रूझ वेधशाळेनं नोंदवलेले २३.८ अंश होते. जे कालच्या तापमाना एवढेच आहे. तर कुलाबा वेधशाळेत २४.५ अंशांची नोंद झाली.

सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी शहरातील किमान तापमान २० अंशांपर्यंत घसरले होते. तर मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी त्यात ३ अंशांनी वाढ झाली.



हेही वाचा

ऐरोलीतील फ्लेमिंगो राईड्सला मिळतोय चांगला प्रतिसाद

कोरोना काळात ८० लाख प्लॅस्टिक कचरा निर्माण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा