चर्चगेट ते वरळी सी-लिंकपर्यंत सायकल ट्रॅक

  Mumbai
  चर्चगेट ते वरळी सी-लिंकपर्यंत सायकल ट्रॅक
  मुंबई  -  

  तुम्हाला सायकल चालवण्याची आवड असेल आणि ते चालवण्यासाठी जागाच नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता चर्चगेटजवळील एनसीपीएपासून ते सी लिंकपर्यंत स्वतंत्र सायकल ट्रॅक बनवला जाणार आहे.

  हा सायकल ट्रॅक दर रविवारी खुला करून देण्यात येणार असून शनिवारच्या दिवशी सकाळी सहा ते अकराच्या वेळेतही हा सायकल ट्रॅक खुला करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.


  असा असेल सायकल ट्रॅकचा मार्ग

  हा सायकल ट्रॅक एनसीपीए - नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह) या मार्गे बाबुलनाथ, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), अॅनी बेझंट मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) अशा सुमारे ११ किमीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच २२ किमी एवढ्या अंतराचा तयार करण्याचे प्रस्तावित असल्याची महिती महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

  तयार करण्यात येणाऱ्या सुमारे २२ किमीच्या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महानगरपालिकेतर्फे तयार केल्या जाणार आहेत. दर रविवारी आणि काही शनिवारी सायकल ट्रॅकची देखभाल करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह तथा स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागवले आहेत. निवड होणाऱ्या संस्थेला हे काम प्रायोजित करण्याच्या अटी आणि शर्तींवर जाहिरात करता येणार आहे, अशीही माहिती दिघावकर यांनी दिली आहे.


  हेही वाचा - 

  ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!

  रूपारेलमध्ये रंगला अनोखा 'सायकल कट्टा'!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.