मुंबईकरांना हव्यात पायाभूत सुविधा

मुंबई - पारदर्शकतेच्या मुद्यावरून भाजपा, शिवसेनेची युती तुटली होती. पण, महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आणि आपली 82 मतं शिवसेनेच्या पारड्यात टाकल्यानं शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौरपदी विराजमान झाले. या नव्या महापौरांकडून मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ने केला. यावेळी रस्ते, शाळा, मैदाने यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात आणि आम्हाला किमान पायाभूत सुविधातरी मिळाव्यात एवढीच अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

Loading Comments