• ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!
 • ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!
 • ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!
 • ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!
SHARE

रोज-रोज होणारी वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीवर पडणारा ताण या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने एक नवी संकल्पना आखली आहे. टीएमसीने देशातील पहिले महत्त्वाकांक्षी स्वयंचलित सायकल स्टेशन उभारले आहे. याच प्रकल्पाअंतर्गत ठाण्यात ५० ठिकाणी सायकल सटेशन उभारण्यात येणार आहेत. यात प्रत्येक स्टेशनवर १० सायकली ठेवण्यात येणार आहेत.शहरातील वाहनांची गर्दी आणि प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेने ग्रीन सायकल हा उपक्रम हाती घेतला आहे


काय आहे ग्रीन सायकल उपक्रम?


 • आय लव सायकलिंग अंतर्गत टीएमसीचा उपक्रम
 • ठाणे महापालिकेने जपानहून मागवल्या 100 सायकली
 • ठाण्यात 50 ठिकाणी असणार स्वयंचलित सायकल स्टेशन
 • प्रायोगिक तत्वावर ठाण्यात विवियाना मॉल, कोरम मॉल आणि माजिवडा येथे स्टेशन्स
 • प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी
 • प्रकल्प यशस्वी ठरल्यास मोबाईल अॅपही सुरु करणार
 • सायकल लॉक-अनलॉक करण्यासाठी स्मार्ट कार्ड मिळणार
 • सभासदत्वासाठी 250 रुपये शुल्क


यामुळे वाहतूक कोंडीपासून तुमची सुटका तर होईलच, शिवाय आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर आम्ही तीन ठिकाणी सायकल स्टँड उभारले आहेत. पण ५० सायकल स्टँड उभारण्यासाठी आणि हा उपक्रम पूर्णपणे सुरू होण्यासाठी अजून दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाईल. जर या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला, तर पुढे जाऊन आणखी सायकल स्टँड उभारणार आहोत. यासाठी आम्ही एक सायकल अॅप सुरू करणार आहोत. या अॅपद्वारे सायकल स्टँडमधून किती सायकल सध्या वापरात आहेत? सायकल कुठे जात आहेत? ही सर्व माहिती ठेवली जाणार आहे, असे टीएमसीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.टीएमसीने सुरू केलेला उपक्रम चांगला आहे. फक्त ठाणेच नाही तर अनेक ठिकाणी ही संकल्पना राबवली जात आहे. यापूर्वी घाटकोपरमध्ये ही संकल्पना राबवली होती. मुलुंडमध्ये राहणारी सायकलस्वार फिरोजा सुरेश ही सुद्धा घर ते ऑफिस असा प्रवास सायकलने करते. मी स्वत: सायकलने ऑफिसला जातो. एक तर सायकलमुळे तुम्ही तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहत नाहीत. शिवाय यामुळे तुमच्या शरीराचा चांगला व्यायाम होतो.     

 अँथनी फर्नांडिससायकलिस्ट

 


ठाणे महापालिकेनेच नाही, तर मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएने सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. पण ते काही ना काही कारणांमुळे फसले. गेल्या वर्षी एमएमआरडीएने प्रायोगिक तत्वावर बीकेसीमध्ये सायकल ट्रॅक बनवला होता. पण त्या ट्रॅकचा वापर पार्किंगसाठी होऊ लागला. त्यामुळे हा ट्रॅक उखडून टाकण्यात आला. त्यामुळे ठाणे महापालिकेने त्यांचा हा अभिनव उपक्रम यशस्वी होण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या