मुंबईला (mumbai) लवकरच अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (csmia) आणि नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना जोडणारा थेट मेट्रो मार्ग मिळणार आहे.
मेट्रो मार्ग क्रमांक 8 (Metro Line 8), ज्याला गोल्ड लाईन (Gold line) असेही म्हणतात. ही मार्गिका सुमारे 35 ते 40 किलोमीटर लांबीचा असेल. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मेट्रोमध्ये 9.25 किलोमीटर भूमिगत आणि 25.63 किलोमीटर उन्नत मार्ग असतील. हा मार्ग अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळ (mumbai airport) च्या टर्मिनल 2 पासून सुरू होईल.
तो चेंबूरमधील छेडानगरपर्यंत भूमिगत असणार आहे. त्यानंतर, तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) पर्यंत उन्नत मेट्रो मार्ग असणार आहे.
हा मार्ग ताशी 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल. यामुळे शहरातील इतर मेट्रो मार्गांपेक्षा तो वेगवान असणार आहे. या मार्गावर आठ स्थानके असतील. यात काही महत्त्वाचे थांबे असतील म्हणजेच कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, वाशी, नेरुळ आणि बेलापूर.
नवी मुंबईच्या बाजूचे काम शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पाहणार आहे.
या मेट्रो मार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवासही सोपा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्याने प्रवास न करता दोन्ही प्रमुख विमानतळांदरम्यान प्रवास करण्यास मदत होईल.
मेट्रो मार्ग 8 इतर मेट्रो मार्गांशी देखील जोडला जाणार आहे. मेट्रो मार्ग 7अ अंधेरी पूर्वेला सीएसएमआयएशी जोडला जाणार आहे. टर्मिनल 2 वर एक भूमिगत स्टेशन आणि एअरपोर्ट कॉलनी येथे एक एलिव्हेटेड स्टेशन असणार आहे.
मार्ग 7 मेट्रो मार्ग 1 (ब्लू मार्ग), मेट्रो मार्ग 6 (पिंक मार्ग) आणि मेट्रो मार्ग 9 ला देखील जोडते. मार्ग 9 हा दहिसर ते मीरा-भाईंदर पर्यंत जातो आणि दहिसर येथे मार्ग 7 ला जोडतो. मार्ग 9 मध्ये भविष्यात मार्ग 2 बी द्वारे अंधेरी पश्चिमेला आणि मार्ग 7 आणि 1 द्वारे घाटकोपरला जोडणार आहे.
सिडकोने नवी मुंबई मेट्रो मार्ग 1अ चा विस्तार करण्याची आणि बेलापूर ते एनएमआयए पर्यंत 3.02 किलोमीटर जोडण्याची योजना आखली आहे. हा सागर संगम इंटरचेंजवर, एनएमएमसी कार्यालयांजवळील मेट्रो मार्ग 8 ला जोडेल.
हेही वाचा