Advertisement

पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'या' ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी

एका प्रवाशानं सांगितलं की, तो जवळपास ४० मिनिटं वाहतूक कोंडीत अडकला होता.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'या' ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी
SHARES

शुक्रवार, १५ एप्रिल रोजी, गोरेगाव ते अंधेरीच्या दिशेनं पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) वरून जाणार्‍या मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

गोरेगावमधील हब मॉलजवळील फ्लायओव्हरवर मोठा अपघात झाला आहे. सामानानं भरलेला ट्रक ब्रिजच्या सुरवातीलाच डिवायडरवर जाऊन आदळला आहे. यासंदर्भात मुंबई लाईव्हला एका प्रवाशानं माहिती दिली. प्रवाशानं पुढे सांगितलं की, सुमारे १५ अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी होते आणि ट्रक काढण्याचा प्रयत्न करत होते.

दुस-या प्रवाशाने WEH वर मालाड पूर्वेपासून अंधेरी पूर्वेपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याचं सांगितलं आहे. प्रवाशानं पुढे सांगितले की, ते आरे फ्लायओव्हरजवळ जवळपास ४० मिनिटं अडकले होते.

अग्निशमन दल सध्या ट्रक हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रकमध्ये काळे कॅन होते. या काळ्या कॅनमध्ये एखादे केमिकल असल्याचं बोललं जात होतं. केमिकलमुळे आग पकडू नये म्हणून ते सर्व कॅन बाहेर काढण्यात आले होते. यासोबतच जर आग पकडू नये म्हणून अग्निशमन दल बंब घेऊन तयार होते.

ट्रक हटवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. पण ज्याप्रकारे ट्रक आदळला आहे हे पाहता तो वेगात असल्याची शक्यता आहे. ट्रकच्या पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला होता. हायवे वर काचेचे तुकडे दूरपर्यंत पसरलेले होते.

ट्रक तिथून हटवेपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी राहील. जवळपास गोरेगावच्या ओबेरॉय मॉलपर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळत असल्याचं आणखी एका प्रवाशानं सांगितलं.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा