Advertisement

वांद्रेतील 'या' मार्गावरील वाहतूक १७ फेब्रुवारीपर्यंत वळवली

वांद्रेमधील 'या' भागात विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहेत. जाणून घ्या पर्यायी मार्ग...

वांद्रेतील 'या' मार्गावरील वाहतूक १७ फेब्रुवारीपर्यंत वळवली
SHARES

वांद्रे पश्चिम येथील सेंट पॉल रोडवर वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. कारण  2 फेब्रुवारी 2023 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत या भागात विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहेत.

सेंट डॉमनिक रोड जंक्शन ते पेरी क्रॉस रोड जंक्शन दरम्यान स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि रस्ता दुरुस्तीची कामे करण्यासाठी खोदकाम केले जाईल. यासाठी वाहतूक पर्यायी रस्त्यावर वळवली जाईल, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

त्यात पुढे असे सांगण्यात आले की, डी'मॉन्टे पार्क रस्ता सेंट डॉमनिक रोड जंक्शन ते पेरी क्रॉस रोड जंक्शनपर्यंत एकेरी असेल आणि पेरी क्रॉस रोडवरून सेंट डॉमनिक रोडकडे प्रवेश नसेल.

'हे' आहेत पर्यायी मार्ग

सेंट पॉल रोडपासून पेरी क्रॉस रोडकडे जाणारी वाहतूक वाहतूक डी'मॉन्टे रोडच्या डाव्या वळणा एवजी सेंट डॉमनिक रोड जंक्शनवर उजवीकडे वळेल आणि पेरी क्रॉस रोडकडे जाईल.



हेही वाचा

नवी मुंबई : रस्त्याच्या कामासाठी सानपाड्यातील 'हा' मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा