Advertisement

स्थानिकांच्या दणक्यानंतर वडाळ्यातील अनधिकृत शेअर टॅक्सी बंद

रस्ता रोको झाल्यानंतर वाहतूक पोलिस विभागाच्या उपायुक्तांसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत करण्याच प्रयत्न केला. परंतु जोवर टॅक्सी तळ बंद होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पावित्रा स्थानिकांनी घेतला. त्यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी हे टॅक्सी तळ त्वरीत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

स्थानिकांच्या दणक्यानंतर वडाळ्यातील अनधिकृत शेअर टॅक्सी बंद
SHARES

वडाळा रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत शेअर टॅक्सीविरोधात शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी गुरूवारी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनानंतर हा शेअर टॅक्सी स्टँड बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. हा शेअर टॅक्सी स्टँड बंद करण्यासाठी परिसरातील स्थानिकांनी रस्ता रोको केल्यानंतर वाहतूक पोलिस खडबडून जागे झाले आणि त्यांनी हे टॅक्सी स्टँड बंद करण्याचं आश्वासन दिलं.

मागणीकडे दुर्लक्ष

वडाळा रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या अनधिकृत शेअर टॅक्सी स्टँडमुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास लक्षात घेऊन १५ दिवसांपूर्वी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस आणि स्थानिक जनतेची संयुक्त बैठक बोलावून हे टॅक्सी तळ बंद करण्याची मागणी केली होती.

स्थानिक संतप्त

त्यावर १५ दिवसांमध्ये हे टॅक्सी तळ बंद करण्यात येईल, असं आश्वासन वाहतूक पोलिसांनी दिलं होतं. परंतु प्रत्यक्षात १५ दिवस उलटून गेले तरी वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे संतप्त झालेल्या वडाळा माटुंगा परिसरातील स्थानिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली वडाळा स्थानकाबाहेरच रस्ता रोको केला. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात वाहनकोंडी निर्माण झाली होती.

आंदोलन मागे

रस्ता रोको झाल्यानंतर वाहतूक पोलिस विभागाच्या उपायुक्तांसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत करण्याच प्रयत्न केला. परंतु जोवर टॅक्सी तळ बंद होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पावित्रा स्थानिकांनी घेतला. त्यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी हे टॅक्सी तळ त्वरीत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

काय आहे परिस्थिती?

वडाळा रेल्वे स्थानकातून दरदिवशी ३५ ते ४० हजार प्रवासी प्रवास करत असतात. प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी बेस्टने बस क्रमांक ११० आणि १७४ अशा दोन बसची व्यवस्था केली आहे. परंतु अनधिकृत शेअर टॅक्सीमुळे या बस प्रवासावर मोठा परिणाम होत होता. तसंच या अनधिकृत शेअर टॅक्सी चालकांकडून कुठेही अनधिकृत कार पार्किंग केली जायची.

त्यामुळे हे टॅक्सी तळ बंद करण्याची मागणी होत होती. दिलेल्या मुदतीनंतरही टॅक्सी तळ बंद करण्यात वाहतूक पोलिस असमर्थ ठरल्याने आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावं लागलं, असं शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा