Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

'सायकल ट्रॅक' सी फेसऐवजी गिरगाव चौपाटीपर्यंतच


'सायकल ट्रॅक' सी फेसऐवजी गिरगाव चौपाटीपर्यंतच
SHARES

मुंबई महापालिकेनं ‘एअर इंडिया मुख्यालय (मरीन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस’ अशी ११.५ किमी अंतराची सायकलिंगसाठी स्वतंत्र मार्गिका (ट्रॅक) तयार केली. दर रविवारी या 'सायकल ट्रॅक'चा लाभ मुंबईकरांना घेता येणार आहे. मात्र वरळीपर्यंत तयार केलेल्या या ट्रॅकला वाहतूक पोलिसांनी मंजुरी न दिल्याने हा ट्रॅक आता गिरगाव चौपाटीपर्यंतच असणार आहे. 


वाहतूक पोलिसांकडून नकार

रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळावी या हेतूने महापालिकेनं स्वतंत्र सायकल ट्रॅक तयार करत दर रविवारी हा ट्रॅक सायकलस्वारांना खुला करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील रविवारी या ट्रॅकचं उद्घाटन झालं. गेल्या रविवारी जुहू चौपाटीपर्यंतच ट्रॅक बनवण्यात आला होता. तर येत्या रविवारी वरळीपर्यंत ट्रॅक बनवून सायकलस्वारांना त्याचा लाभ देण्याचा महापालिकेचा मानस होता. पण, वाहतूक पोलिसांनी, वरळीपर्यंत हा सायकल ट्रॅक बनवण्यास नकार दिल्याने मुंबईकरांना या रविवारी केवळ गिरगावपर्यंतच सायकलिंगचा आनंद लुटता येणार आहे.


या रविवारी गिरगावपर्यंतच  

येत्या रविवारी सकाळी ६.०० ते १०.०० दरम्यान सायकल चालवण्यागसाठी हा ट्रॅक राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सायकलस्वारांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. वाहतूक पोलिसांनी काही तांत्रिक कारणांमुळे वरळीपर्यंत ट्रॅक तयार करू न दिल्यामुळे गिरगावपर्यंतच या रविवारी सायकलिंग करता येईल, अशी माहिती ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.


भाड्याने मिळेल सायकल

मुंबईकर स्वतःची सायकल आणून या ट्रॅकवर चालवू शकतात किंवा ज्यांच्याकडे स्वतःची सायकल नाही, त्यांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. यासाठी तासाला १०० रुपये शुल्क आकारून भाड्यानं सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हेही वाचा - 

मरीन ड्राईव्हला स्वतंत्र सायकल ट्रॅक सुरु!

वरळी ते चर्चगेटदरम्यान सायकल चालवा सुसाट!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा