मुंबई विद्यापिठात बाबासाहेब, महाराजांची संयुक्त जयंती साजरी

 Kalina
मुंबई विद्यापिठात बाबासाहेब, महाराजांची संयुक्त जयंती साजरी
Kalina, Mumbai  -  

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पस येथे साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने मंगळवारी सकाळपासूनच विद्यापिठात कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा देखावा निर्माण करण्यात आला होता.

विद्यापीठ परिसरात मंगळवारी दुपारनंतर शोभा यात्रा काढण्यात आली होती. या वेळी मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची दोन व्यक्तींनी वेशभूषा देखील केली होती. संध्याकाळी गणेश चंदनशिवे यांचा जलसा देखील काढण्यात आला होता. या मध्ये विद्यापिठातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे आणि मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू संजय देशमुख उपस्थित होते.

Loading Comments