Advertisement

मुंबईत बुधवारी लसीकरण बंद

मुंबईत ४ ऑगस्ट बुधवार रोजी लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेनं याची माहिती दिली आहे.

मुंबईत बुधवारी लसीकरण बंद
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार, मुंबईसह राज्यभरात लसीकरण केल जात आहे. परंतू, लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळं मुंबईत बुधवारी लसीकरण बंद असणार आहे. महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केलं जाणार नसल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

मुंबईत वेगानं लसीकरण सुरू असतानाच लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळं लसीकरणात खोळंबाही निर्माण होताना दिसत आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या सुरूवातीला केंद्रानं विशिष्ट वयोगटातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. यामुळे राज्ये आणि महानगरांमध्ये लस खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर केंद्रानं १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळं प्रश्न कायम आहे.

मुंबईत ४ ऑगस्ट बुधवार रोजी लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेनं याची माहिती दिली आहे. 'मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की ४ ऑगस्ट २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू', असं महापालिकेनं म्हटलं आहे.



हेही वाचा -

राज्यात ६ हजार नवीन कोरोना रुग्णांचं निदान

Unlock Guideline In Mumbai : मुंबईत काय सुरू? काय बंद? वाचा सविस्तर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा