Advertisement

मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना सध्या थंड वातावरणामुळं दिलासा मिळत आहे.

मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना सध्या थंड वातावरणामुळं दिलासा मिळत आहे. त्यातच मुंबईत थंडीचा जोर वाढला असून, गुरुवारी सकाळी मुंबईकरांना हुडहुडी भरली. मुंबईत दुपारपर्यंत हवेत गारवा होता. मुंबईत या मोसमात पहिल्यांदाच किमान तापमानाने निचांकी गाठली.

फारशा थंड हवेची सवय नसलेल्या मुंबईकरांना पारा १८ अंशांखाली गेला तरी गारव्याची जाणीव होते. गेल्या आठवड्यात १९ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होते. त्यानंतर सोमवारपासून पारा आणखी खाली घसरू लागला.

सांताक्रूझमध्ये नोंद झाल्यानुसार गेले २ दिवस १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर गुरुवारी सकाळी पारा १८ अंशांच्या खाली उतरला. यंदाच्या ऋतुमधील हे मुंबईतील सर्वात कमी तापमान आहे.

नोव्हेंबरमध्ये किमान तापमानाचा पारा २५ अंशांपलीकडेही काही वेळा गेला होता. डिसेंबरच्या पंधरवड्यातही किमान तापमानाने थंडीची जाणीव करून दिली नाही. पहिल्या १५ दिवसांमध्ये एकच दिवस १८.५ अंश सेल्सिअसपर्यंत मुंबईचे तापमान उतरले आणि धुक्याचा अनुभव घेता आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा किमान तापमानाने उसळी घेतली होती.

मुंबईमध्ये प्रदीर्घ काळ थंडीचा अनुभव घेता येत नसला तरी एकच दिवस तापमान उतरून नंतर लगेच वाढायलाही सुरुवात होत नाही. किमान काही काळ गारठ्याचा अनुभव घेता येतो. या आठवड्यामध्ये हा अनुभव मुंबईकरांना घेता आला आहे.

पारा घसरल्यानं मुंबईत गारठा वाढला आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या १० वर्षांमध्ये १७ अंशांखालीही तापमान गेले आहे. आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान १०.६ अंश सेल्सिअस होते. ही नोंद सन १९४९ मधील आहे. आता गुरुवारपेक्षा किमान तापमान खाली उतरणार का, यासाठी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्याची वाट पाहावी लागेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा