Advertisement

मुंबईत फटाके फोडण्यास परवानगी, पण.....

प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने यावेळी मार्गदर्शक नियामवली लागू केली आहे.

मुंबईत फटाके फोडण्यास परवानगी, पण.....
SHARES

दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषणही होते. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच त्रास होतो. त्यासोबतच पर्यावरणाचेही नुकसान होते. त्यामुळे प्रदूषण होऊ नये, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई (mumbai) महापालिकेने (BMC) यावेळी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.

फटाके वाजवताना ही काळजी घ्यावी

- ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळावे

- ध्वनीविरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे

- कमीत कमी वायुप्रदूषण करणारे फटाके फोडावेत

- ज्येष्ठ नागरिक आणि हृदयरुग्णांप्रती जबाबदारी जाणून तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे

- फटाके फोडताना शक्यतो सुती कपडे परिधान करावेत. सैल कपडे वापरू नयेत

- फटाके मोकळ्या जागी फोडावेत

- फटाके फोडताना सुरक्षेचा भाग म्हणून पाण्याने भरलेली बादली, वाळू इत्यादी बाबी जवळ बाळगाव्यात.

- फटाके फोडताना वाळलेली पाने, कागद किंवा कोणतीही इतर सामग्री जाळू नये.

- फटाके फोडताना फुलबाजी किंवा अगरबत्तीचा वापर करा

हे करू नये

- इमारतीच्या आत आणि जिन्यावर फटाके फोडू नयेत.

- फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा

- झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नये.

- खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या किंवा दिवे लावू नये.

- विजेच्या तारा, गॅस पाइपलाइन किंवा पार्किंगच्या ठिकाणी फटाके फोडू नये.

- इमारतीला रोषणाई करताना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये. सैल जोडणी टाळावी.

मुंबईत दिवाळी साजरी करताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची (firecrackers) आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे उत्साहाच्या भरात आगीच्या दुर्घटना घडतात. दिवाळीत सर्वात जास्त आगीच्या घटनांची शक्यता ही झोपडपट्टी, चाळी, वस्तींमध्ये अधिक असते.

त्यामुळे महापालिकेने मुंबईतील 167 ठिकाणी फटाक्यांसदर्भात जनजागृती मोहीम पार पडली होती. यंदाही ही मोहीम हाती घेताना विशेष करून झोपडपट्यांमध्ये जनजागृतीवर अधिक भर असणार आहे. आगीची घटना घडल्यास 101 क्रमांकावर किंवा महापालिका हेल्पलाइन क्रमांक 1916 वर कॉल करून त्वरित माहिती देण्याचेही आवाहन केले आहे.

गेल्या आठ महिन्यांत मुंबई अग्निशमन दलाकडे 3 हजार 192 आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू आणि 113 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन जण अग्निशमन दलाचे जवानही आहेत.

सदोष वायरिंग, निष्काळजीपणामुळे धूम्रपान करणे किंवा ती विझवताना पुरेपूर काळजी न घेणे, सिलिंडर स्फोट, स्टोव्हचा भडका इत्यादी आग लागण्यासाठी कारणीभूत ठरतात. पश्चिम उपनगरात सर्वाधिक आगीच्या घटनांची नोंद झाली.



हेही वाचा

गोपाळ शेट्टी बोरिवली मतदारसंघातून अपक्ष लढणार

उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा