Advertisement

गोपाळ शेट्टी बोरिवली मतदारसंघातून अपक्ष लढणार

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गोपाळ शेट्टी बोरिवली मतदारसंघातून अपक्ष लढणार
SHARES

भारतीय जनता पक्षाने संजय उपाध्याय यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. विद्यमान आमदार सुनील राणे किंवा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नावाची पक्ष कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, मात्र भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले.

उपाध्याय यांना विलेपार्लेमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती, मात्र अखेरच्या क्षणी घडलेल्या घडामोडीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बोरिवलीत पुन्हा एकदा ‘बाहेरच्या’ व्यक्तीला संधी दिल्याने बोरिवलीतील कार्यकर्त्यांची निराशा झाली.

या निराशेनंतर शेट्टी यांनी बोरिवलीच्या जनतेला स्थानिक नेतृत्व देण्यासाठी बोरिवलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून बोरीवलीत खळबळ उडवून दिली.



हेही वाचा

विधानसभेत तिकीट न मिळाल्याने 'हे' नेते अपक्ष लढणार

विधानसभा निवडणुकीसाठी आठ माजी नगरसेवक रिंगणात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा