ओला, उबेरविरोधात संताप

मुंबई - महिन्याला १ ते दीड लाख रूपये हमखास उत्पन्न मिळवा या ओला उबेरच्या जाहीरातींना अनेक टॅक्सीचालक भुलले. आपली फसवणूक झालीये हे लक्षात येताच त्यांनी संपाच हत्यार उगारलं. कंपनीने दिलेल्या अश्वासनानुसार ठराविक उत्पन्न द्यावे, अशी मागणी यावेळी टॅक्सी चालकांनी केली. मात्र शुक्रवारी ओला उबेर टॅक्सीचालकांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे मात्र चांगलेच हाल झाले. याबाबत मुंबईकरांचे काय म्हणणे आहे ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments