Advertisement

वाढीव बिलामुळं मुंबईकरांना बसतोय 'विजे'चा धक्का

कोरोनाच्या संकटामुळं काही कंपन्यांनी शटर डाऊन केल्यानं अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं आहे.

वाढीव बिलामुळं मुंबईकरांना बसतोय 'विजे'चा धक्का
SHARES

चीनसह जगभरात थैमान घातलेल्या जीवघेणा कोरोना व्हायरसचा मुंबईत प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या संकटामुळं काही कंपन्यांनी शटर डाऊन केल्यानं अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं आहे. अशावेळी आर्थिक स्थिती कशी सांबाळायची? घर कसं सांबाळायचा? महिन्याच्या खर्च कसा सांबाळायचा? हे प्रश्न सातावत आहेत. मुंबईकरांना पडलेले हे प्रश्न लक्षात घेता त्यांच्या महिन्याच्या खर्चातून दिलासा देण्यासाठी मुंबईची दुसरी लाइफलाइन बेस्टनं वीजेच्या बिलात कपात केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या मध्यात लॉकडाऊन सुरू झाला. तसंच कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन मीटरचं रीडिंग घेणं शक्य नसल्यामुळं प्रशासनानं ग्राहकांना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीच्याच रीडिंगच्या आधारे सरासरी बिल आकारलं जावं. त्यानुसार मागील ३ महिने बिल लोकांना आलं. लोकांनी भरलं ही, मात्र आता अचानक वीज बिलाची रक्कम दुप्पट-तिप्पट पटीनं आल्यानं मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश दिले होते. त्यामुळं नागरिकांसह सरकारची विविधे कामं अडून राहिली होती. मात्र, तब्बल ३ महिन्याच्या काळानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान अचानक वीज बिलाची रक्कम अधिक आल्यानं नेहमीच्या बिलाची रक्कम आणि लॉकडाऊनच्या काळातील बिल पाहता त्यामध्ये फार तफावत जाणवली. त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिक अचानक एवढं वीज बिल कसं आलं? या प्रश्नानं चिंतेत पडले आहेत. 'आधीच कडकी त्यात एवढं वीज बिल', त्यामुळं हे वीज बिल भरायचं का असा प्रश्न नागरिकांनी सतावत आहेत.

मुंबईत ४ कंपन्या वीज पुरवठा करत आहे. यामध्ये MSEDCL, BEST, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) आणि Tata Power Company (TPC) कंपनीचा समावेश आहे. वाढीव बिलाच्या प्रकरणाबाबत बेस्ट उपक्रमशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अंदाजित वीज बिल दिल्याचं त्यांनी म्हटलं. जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल होताच, प्रत्यक्ष रीडिंग घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा मार्च ते जून या दोन रीडिंगमधला फरक ओळखून, त्यातून मार्च आणि एप्रिलचं देण्यात आलेलं सरासरी बिल वजा करून जे रीडिंग आलं, ते आकारण्यात आल्याचं वीज कंपन्यांचं म्हणणं आहे.

अचानक वीज बिल तिप्पट आल्यानं नागरिकांनी बेस्टच्या कारभारावर टीका केली. काहींनी आपल्या परिसरातील स्थानिक नेत्यांची वाट धरली. तसंच, जून महिन्यात ५ हजार रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत वीज बिलं आल्यानं या ही वाढीव बिलं असल्याच्या तक्रारी करत वीज ग्राहकांनी वीज कंपन्यांवर टिका करत आंदोलन केली.  जनतेच्या आंदोलनाची व रोषाची तिव्रता लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आर्थिक परिस्थिती बिकट होऊ नये यासाठी बेस्टनं मुंबईकरांना दिलासा दिला.

वीज बिलापोटी घेतलेली जादा रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागानं घेतला. तसंच, ज्यांना सरासरी वापरावर दिलेल्या अंदाजित रकमेची बिले प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी रकमेची असल्यास, त्यांना बिलंबशुल्कासह (व्याजासह) ३ समान मासिक हप्त्यात रक्कम भरण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

जादा घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला आहे. ही रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना कमी रकमेची बिले देण्यात आली आहेत, त्यांना प्रत्यक्ष वापरावर आधारित बिले सादर करण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमानं रेड झोन वगळता इतर भागात मीटर रिडींग करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळं ग्राहकांना प्रत्यक्ष वापरावर वीजबिले आकारण्यास सुरुवात होणार आहे. बेस्ट उपक्रम जादा घेतलेली रक्कम व्याजासह परत करणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या व्याजासह रक्कम परत करण्याच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी बिल भरली तर, काही अजूनही चिंतेत आहेत. रक्कम भरली तर उर्वरित खर्च कसा भागवायचा? आणि वीज बिल भरलं नाही तर, अंधारात राहावं लागणार, या भीतीनं हळुहळू ग्राहक वीज बिल भरत आहेत. ग्राहकांची हि 'नड' लक्षात घेता बेस्टनं हप्त्यानं बिल भरण्याचं आवाहन केलं आहे. त्याशिवाय सध्याची परिस्थिती पाहता राज्य वीज मंडळासह टाटा पॉवर, अदाणी आदी खासगी कंपन्यांनीदेखील घरगुती आणि व्यावसायिक वीजबिले ही किमान रकमेनुसार आकारावीत, अशी मागणी ग्राहक करत आहे.



हेही वाचा -

फोर्ट इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अद्याप बचावकार्य सुरुच

कालच्या मुसळधार पावसात ‘इतक्या’ दुर्घटना मुंबईत घडल्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा