प्रवाशांसाठी मोफत थंडगार पाणी

 Dadar
प्रवाशांसाठी मोफत थंडगार पाणी
Dadar , Mumbai  -  

सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढत असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे अशा रणरणत्या उन्हाळ्यात रोज धावपळ करणाऱ्या मुंबईकरांना बर्फ टाकलेले थंड पाणी मोफत प्यायला मिळावे, यासाठी दत्त संप्रदायातील दत्त भक्त प्रयत्न करत आहेत.

दादर हे मुंबई शहरातले मह्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई शहरात दररोज लाखो प्रवाशांची दादर स्थानकावर वर्दळ असते. अन्न पाण्याची पर्वा न करता कामाच्या मागे धावत सुटलेल्या मुंबईकरांना आणि मुंबईत आवर्जून आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दादर रेल्वे स्थानकाच्या फुलमार्केटजवळील पुलावर थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोफत थंड पाण्याची ही योजना कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याने केलेली नाही. तर दत्त संप्रदायातील दत्त भक्तांनी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रोज 500 लीटर थंड पाणी 4 एप्रिल पासून ते मे महिना संपेपर्यंत या ठिकाणी देण्यात येणार आहे. इथून पुढे दरवर्षी हा उपक्रम सुरुच राहाणार असल्याचं आयोजकांनी सांगितले.

Loading Comments