Advertisement

आपला माणूस , थकला माणूस...!

अलीकडेच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला. स्विस बँक युबीएस ने जगभर एक सर्व्हे उर्फ निरीक्षण केलं. जगातील ७७ शहरात त्यांनी हा सर्व्हे केला. त्यात म्हणे त्यांना मुंबईकर सर्वाधिक काम करताना आढळले.

आपला माणूस , थकला माणूस...!
SHARES

मुंबईकर २४ तास धावत असतो. घरातून बाहेर पडला रे पडला की तो धावत बस पकडतो. मग झेपावत ट्रेन पकडतो. घाम गाळत तो ऑफिस गाठतो. मग मरेस्तोवर काम करत तो घामाचे कपडे वाळवतो. बंद असो मोर्चा असो त्याची तक्रार नसते. मुंबईकरांच्या या दमछाकीला मीडियावाले अलीकडे स्पिरीट म्हणून कौतुक करतात. करोत बापडे. पण कधीतरी त्याला स्पिरीट पिण्याची वेळ येणार आहे ! काही असो, पण मुंबईकर सतत धावत असतो. पण हे जगाला कळायला वेळ लागला ना.

अलीकडेच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला. स्विस बँक युबीएस ने जगभर एक सर्व्हे उर्फ निरीक्षण केलं. जगातील ७७ शहरात त्यांनी हा सर्व्हे केला. त्यात म्हणे त्यांना मुंबईकर सर्वाधिक काम करताना आढळले. गेली १५ वर्षे माझ्या बॉसला माझ्या कामाबद्दल मी सतत हेच सांगतोय. पण त्याला काही ते कळले नाही. तर त्या स्विस बँकेने मुंबईकराच्या कामाचे तास मोजले. माझ्याकडे तर माझ्या ओव्हर टाइमचे हजारो चिटोरे माझ्या माळ्यावर पडलेत. असो

मुंबईकर दरवर्षी ३३१४.७ तास काम करतो. मी नाही तर तो सर्व्हे म्हणतो. एकूण सरासरी १९८७ तास काम करतो मुंबईकर. सर्व्हेवाले म्हणतात मुंबईकर जगातील इतर लोकांपेक्षा दुप्पट काम करतात. आणि इकडे आमचे राजकारणी दाम दुप्पट वसूल करतात. बिचारा मुंबईकर किती काम करतो बघा. उशिरा का होईना, पण जगाला कळलं तरी.

सर्व्हे सांगतो रोममधील लोक १५८१ तास काम करतात. इतर वेळी रोमियोगिरी करतात कि काय? पॅरिसमधील लोक १६६२ तास काम करतात. आता पॅरीसबद्दल मी बोलायला नको. त्यांना कुणी वारीस नसतो, नुसती मज्जा करतात म्हणे. आम्ही अजून अालियाला पहिलं नाहीय म्हणजे तिचा राझी पहिला नाहीय. नशीब फुटकं अजून काय !

'बाय द वे' त्या सर्व्हे करणाऱ्या स्विस बँकेला कुणीतरी विचारायला हवं. खडसवायला हवं. आमच्याकडच्या काळ्या पैशाचं काय झालं? आम्ही राब राब राबतो आणि इथले वस्तादलोक तो पैसा हडप करून तुमच्या बँकेत ठेवतात. तुम्ही ति यादी दोनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध करणार होता? म्हणे मुंबईकर खूप काम करतो. घाम गळतो. कष्ट करतो. लाज नाही वाटत असले सर्व्हे करायला. इथले सर्वे लोक तुम्हाला मूर्ख वाटले काय?


बकेट आणि लिस्ट

मंडळी गेला आठवडाभर आमचा डोळ्याला डोळा लागलेला नाहीय. कारण आधीच सांगतो, माधुरी दीक्षित ..! अहो या धक धक गर्लचे आम्ही खूप आधीपासून फॅन आहोत. कधी एकदा तिचा बकेट लिस्ट पाहतोय, असं झालंय. काल बॉसला मेल केला म्हटलं उद्या ऑफिसला येणार नाही. वाईफ नॉट वेल. त्यामुळे मलापण नॉट वेळ! सकाळीच मस्त टकाटक दाढी केली.

बायकोनं हळूच पहिलं. म्हटलं हिला काय कळणार. झपाझप मस्त कपडे घातले. फासाफस मस्त सेंटपण मारला. बायकोने हळूच पहिले. म्हटले हिला काय कळणार. निघताना दरवाजावर मांजरासारखी आडवी आली न. म्हणाली हे घ्या बकेट आणि ही किराणमालाची लिस्ट. बाजारातून हे समान लवकर आणायचे. म्हणाली वाईफ नॉट वेल काय. मला धक्का बसतो न. हिला कसे कळले? वर ति म्हणते येताना रिमोटचे दोन सेल घेऊन या. रात्री मला बिग बॉस मराठी बघायचंय. मी मान खाली घालत म्हणतो येस बॉस...!


- बापू मिर्चीवाले 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा