SHARE

मुंबईला घडवण्यात हातभार लावलेल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांना सलाम करण्यासाठी पर्ल अॅकॅडमीने पुढाकार घेत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. पर्ल अॅकॅडमीच्या वतीने शुक्रवारी गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. जिथे मॉडल नाही तर मुंबईचे डबेवाले, टॅक्सीचालक, पोलीस हवालदार आणि मच्छिमार यांच्या पत्नी रॅम्प वॉक करण्यासाठी उतरतील.

त्यांच्या मेकअपपासून ते पोशाखपर्यंतचे आयोजन पर्ल अॅकॅडमीच्या वतीने केले जाणार आहे. या फॅशन शोमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा देखील उपस्थित राहतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या