Advertisement

मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांनंतर पुन्हा 'मराठी'

सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील मराठी विभाग १९८५ मध्ये बंद करण्यात आलं होतं.

मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांनंतर पुन्हा 'मराठी'
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांपूर्वी बंद झालेला मराठी विभाग पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत (NEP) प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळेच आता या कॉलेजमध्ये मराठी विभाग पुन्हा सुरू होऊ शकला.

मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांपूर्वी बंद झालेला मराठी विभाग पुन्हा सुरू झाला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळेच हे शक्य झाले आहे.

सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील मराठी विभाग १९८५ मध्ये बंद करण्यात आलं होतं. या विभागात मोजकेच विद्यार्थी होते. याशिवाय जे प्राध्यापक एकहाती हा विभाग सांभाळत होते, ते देखील निवृत्त झाले होते. त्यानंतर बीए (मराठी) अभ्यासक्रम बंद करण्यात आला होता.

काही कारणांमुळे संपूर्ण विभाग कार्यान्वित ठेवणं अशक्य असल्याने कॉलेज व्यवस्थापनाने मराठी विषय पर्याय म्हणून पदवीच्या पहिल्या वर्षासाठी सुरू ठेवला. अवघ्या १० टक्के विद्यार्थ्यांनी या विषयाला पसंती दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय शिक्षण धोरणातील एईसी अंतर्गत मराठी भाषेचा पर्याय दिला जाईल. विद्यार्थ्यांना आता मुख्य, आणि ऐच्छिक विषयांसोबत मराठी विषय निवडण्याचा पर्याय असेल. 

फेरीतील प्रवेश १९ जूनपासून सुरू झाले असून, आतापर्यंत १२० विद्यार्थ्यांनी मराठी विषय निवडला आहे. सेंट झेव्हियर्स कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, मोरेश्वर पेठे हे मराठी विभागात कार्यरत होते. मराठी विभागात सेवा देणारे ते एकमेव प्राध्यापक होते. १९८४ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर हा विभाग बंद करण्यात आला. (Mumbai)

'त्यावेळी अभ्यासक्रमासाठी फारच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. कॉलेजने नंतर मराठीसाठी पार्ट टाइम शिक्षक नेमण्याचा प्रयत्न केला, पण संख्या कमी होत गेली.

वर्षभरात मराठीचा अभ्यासक्रम बंद झाला. त्यामुळे आमच्याकडे १९८५-८६ पासून पदवी महाविद्यालयात मराठी विषय उपलब्ध नाही', असे मुख्याध्यापक शिंदे यांनी सांगितले. (Latest Marathi News)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा