Advertisement

म्युनिसिपल बँक चार पुरस्काराचे मानकरी


म्युनिसिपल बँक चार पुरस्काराचे मानकरी
SHARES

मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांच्या “दि. म्युनिसिपल को.ऑप.बँक लिमिटेड, मुंबई” या बँकेला बँकिंग क्षेत्रातील `बँकिंग फ्रंटीअर्स' या ख्यातनाम प्रकाशनातर्फे सन २०१७-१८ करिता चार पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. बँकेचे कार्याध्यक्ष आणि महापालिकेचे उपायुक्त (शिक्षण) मिलिन सावंत यांना 'सर्वोत्कृष्ट कार्याध्यक्ष' या पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलं आहे.


'या' बँकेने पटकावले पुरस्कार

`बँकिंग फ्रंटीअर्स' द्वारे पगारदार नोकरांच्या गटातील बँकेला देण्यात येणारे महत्त्वाचे ३ पुरस्कार देखील महापालिका कर्मचाऱ्यांच्याच बँकेने पटकावले आहेत. यामध्ये बँकेस सर्वोत्कृष्ठ माहिती आणि तंत्रज्ञान प्रमुख, बेस्ट क्रेडिट ग्रोथ आणि सर्वोत्कृष्ठ एन.पी.ए.व्यवस्थापन यासाठी बँकेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मल:निसारण विभागाचे प्रमुख लेखापाल व बँकेचे तज्ज्ञ संचालक रामदास आव्हाड हेही या प्रसंगी उपस्थित होते.


अनेक पुरस्कारांनी सन्मान

'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि.' चे पदसिद्ध अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि पदसिद्ध उपाध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मोठ्या प्रमाणात आपल्या कामाचा विस्तार वाढवला आहे. या बँकेचे कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त मिलिन सावंत यांनी बँकेचे उत्तमरित्या व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे सर्वांगीण आर्थिक प्रगतीतही मोठ्याप्रमाणात वाढ झालेली आहे.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकेला आतापर्यंत अनेक सहकारी क्षेत्रातील व बॅकिंग क्षेत्रातील पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेले आहे.

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ही महानगरपालिका कर्मचाऱ्यांची बँक असून दिनांक ३१.०३.२०१८ पर्यंत ८५,४३९ महापालिका कर्मचारी बँकेचे सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण आर्थिक गरजा भागवण्यासाठी कार्यरत आहे.


५ पुरस्कार प्राप्त

महापालिका कर्मचाऱ्यास कर्ज सुविधा मुदतीत देत असते. तर नागरिकांसाठी बँकिंग सुविधा उत्तमरित्या देत असते. उत्कृष्ट नियोजन तसेच कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ग्रॉस एन.पी.ए. चे प्रमाण कमी झाले असून बँकेने गेल्या ६ वर्षात चौफेर प्रगती केली असून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी बँकेस नामांकित असे ५ पुरस्कार प्राप्त झाले असल्याचंही बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा