Advertisement

Coronavirus Updates: उपाययोजनेसाठी निधी खर्च करण्याचे महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार

कोरोना व्हायरसच्या उपाययोजनेसाठी तातडीनं निधी खर्च करण्याचे महापालिका आयुक्तांना (Municipal commissioner) विशेषाधिकार देण्यात आले आहेत.

Coronavirus Updates: उपाययोजनेसाठी निधी खर्च करण्याचे महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार
SHARES

कोरोनाचा (Corornavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेनं (BMC) उपाययोजना करण्यासाठी कंबरकसली आहे. विविध उपाययोजना करतच आता या उपाययोजनेसाठी तातडीनं निधी खर्च करण्याचे महापालिका आयुक्तांना (Municipal commissioner) विशेषाधिकार देण्यात आले आहेत. हे विशेषाधिकार स्थायी समितीनं (Standing Committee) मंगळवारी महापालिका आयुक्तांना दिले.

करोनाचा मुकाबला करताना निधी खर्च करण्यात आयुक्तांना अडथळा येऊ नये म्हणून स्थायी समितीनं (Standing Committee) मंगळवारी तातडीची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एकमतानं महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'राज्य सरकारनं साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७' आणि 'घातक रोग प्रसार प्रतिबंधक कायदा १८८८'नुसार मुंबईमध्ये करोना साथीचा आजार म्हणून जाहीर केला आहे.

आपत्कालीन व्यवस्थेअंतर्गत निर्णय घेऊन तातडीनं निधी खर्च करण्यासाठी महापालिका आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात यावे, असे विनंतीपत्र महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी (Municipal Commissioner Pravin Singh Pardeshi) यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांना सोमवारी पाठविले होते. ही अतिमहत्त्वाची बाब असल्यानं स्थायी समितीनं त्यास तातडीनं मान्यता द्यावी, असंही आयुक्तांनी या पत्रात नमूद केलं.

कस्तुरबा रुग्णालयात येणाऱ्या संशयित रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्या, पाणी इत्यादी सुविधा निर्माण केलेल्या आहेत. रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. तसंच इथं येणाऱ्या प्रत्येकाला मास्क किंवा रुमाल बांधण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.



हेही वाचा - 

Coronavirus Updates: कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी 'इतक्या' जणांनी लावली हजेरी

Coronavirus: अतिरिक्त भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर होणार कारवाई - अनिल परब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा