Advertisement

BMCने ब्रीच कँडी जवळील अनधिकृत बांधकाम हटवले

कारवाई दरम्यान भुलादेसाई रस्त्यावरील 'नारायण डोसा' या उपाहारगृहाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले.

BMCने ब्रीच कँडी जवळील अनधिकृत बांधकाम हटवले
SHARES

महापालिकेने (bmc) बुधवारी टाटा गार्डन्स, मुंबईतील (mumbai) ब्रीच कँडीजवळील भुला देसाई रोडवरील रेस्टॉरंट्स आणि दुकानांचे बेकायदेशीर बांधकाम जमिनदोस्त केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municiple corporation) कायद्याच्या कलम 351 अन्वये या कारवाईची मालकांना नोटीस बजावण्यात आली होती. अखेर डी प्रभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनधिकृत बांधकाम (illegal alterations) हटवले.

कारवाई दरम्यान भुलादेसाई रस्त्यावरील 'नारायण डोसा' या उपाहारगृहाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. डी वॉर्डमधील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "नोटीस बजावल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली".

बुधवारी सायंकाळपर्यंत अंदाजे 70 चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त (demolished) करण्यात आले. या कारवाई दरम्यान प्रभागातील दोन अभियंते, दोन मुकादम, एक जेसीबी, पाच मजूर आणि सात पोलिस कर्मचारी, गावदेवी पोलिसांनी पाठवलेले पोलिस सुरक्षेसाठी तैनात होते.



हेही वाचा

अक्षय शिंदे एन्काऊंटर : पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा