Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांना 20 टक्के सानुग्रह अनुदानाची मागणी


पालिका कर्मचाऱ्यांना 20 टक्के सानुग्रह अनुदानाची मागणी
SHARES

मुंबई पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी,अधिकारी आणि कंत्राटी कामगारांना 20 टक्के रक्कम सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. म्युनिसिपल मजदूर युनियनकडून ही मागणी करण्यात आली आहे..पालिकेत सुमारे एक लाख 11 हजार कर्मचारी वर्ग आहे. महापौर दरवर्षी सानुग्रह अनुदानाची घोषणा करत असतात, मात्र कामगारांना सानुग्रह अनुदान किती द्यायचे हा निर्णय पालिका प्रशासन घेते. तसंच यंदाही पालिका कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या एकूण वित्तलब्धीच्या 20 टक्के रक्कम सानुग्रह अनुदान दिवाळी पूर्वी देण्यात यावं अशी मागणी युनियनने महापौर स्नेहल आंबेकर आणि विविध समित्या अध्यक्षाकडे केली आहे. 2016-17 च्या अर्थसंकल्पामध्ये पालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटी कामगारांसाठी पालिकेने बोनस, सानुग्रह अनुदानाची तरतूद केली आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वी २० टक्के सानुग्रह अनुदान मिळावे, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी यांनी म्हटले आहे.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा