Advertisement

नायर रुग्णालयात उपचारांसाठी उपकरणंच नाहीत!


नायर रुग्णालयात उपचारांसाठी उपकरणंच नाहीत!
SHARES

आग लागून दोन महिने उलटल्यानंतरही पालिकेने नवीन उपकरण खरेदीसंदर्भात कोणताच प्रस्ताव पाठवलेला नाही. ही स्थिती आहे पालिकेच्या नायर रुग्णालयाची.   

मुंबई सेंट्रल इथल्या नायर रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी आग लागली होती. रुग्णालयाच्या महाविद्यालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कान-नाक-घसा आणि ऑडिओ स्पीच थेरेपी विभागात ही आग लागली होती. त्या आगीत जवळपास दीड कोटींची उपकरणं जळून खाक झाली होती. त्यामुळे नवीन उपकरणांच्या खरेदीसंदर्भात पालिकेला प्रस्तावही पाठवण्यात आला होता. पण, अजूनही या रुग्णालयात नवीन उपकरणे आणण्यात आलेली नाही.

या रुग्णालयात कान-नाक-घसा आणि ऑडिओ स्पीच थेरेपी हे दोन विभाग मागील 30 ते 35 वर्षांपासून सुरू आहेत. पण, आग लागल्यानंतर हे विभाग काही दिवस बंदच होते. पण, आता या विभागातून रुग्णांना योग्य ते उपचार दिले जात असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.


रुग्णालयात नवीन उपकरणांबाबतचा प्रस्ताव पालिकेला पाठवला आहे. पण, ती उपकरणे रुग्णालयात आणण्यासाठी अजूनही 5 ते 6 महिने लागतील. इमर्जन्सी असलेल्या रुग्णांना केईएम किंवा सायन रुग्णालयात पाठवतो. पण, छोट्या छोट्या ट्रिटमेंट इथे केल्या जातात. त्यासाठी ही उपकरणं आवश्यक आहेत.

- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

या विभागात अनेक महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे आणि स्पीच थेरपीसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिडिओ मशिन होत्या. पण, आगीत त्या सर्व भस्मसात झाल्या. नायर रुग्णालयातील कान-नाक-घसा या बाह्यरुग्ण विभागात दरदिवशी 200 ते 250 रुग्ण उपचारासाठी येतात. तर, व्हिडिओ स्पीच थेरेपीसाठी जवळपास 40 ते 50 रुग्ण येतात. पण, रुग्णांच्या उपचारात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची आपण काळजी घेत असल्याचेही डॉ. भारमल यांनी स्पष्ट केले आहे.




हेही वाची -

पाहिजे, रुग्णांच्या हक्कासाठी कायदा!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा