पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा

 BMC office building
पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा
पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा
पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा
पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा
पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा
See all

परळ - ग.द. आंबेकर मार्गावरील पदपथावर गेल्या दोन महिन्यांपासून पेव्हर ब्लॉकचं अर्धवट काम झालंय. त्यामुळे इथून जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याकडे पालिका आणि लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पदपथांवर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पालिकेच्या विशेष निधीतून हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून येथील काम सुरु करण्यात आलेले नसून त्या ऐवजी पदपथावर पेव्हर ब्लॉकचा पसारा करून ठेवण्यात आला आहे. तर याबाबत नगरसेवक सुनिल मोरे यांच्याशी चर्चा केला असता आरटीओ कार्यालयाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे काम थांबले असून येत्या एका आठवड्यात काम मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. तर गेल्या कित्येक दिवसांपासून या पदपथावर पेव्हर ब्लॉक, खडी आणि रेती टाकून ठेवण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना येथून अडथळ्यांची शर्यत पार करत वाट काढावी लागत असून जेष्ठ नागरिक, रुग्ण आणि अपंगांना याचा नाहक त्रास करावा लागत आहे, असे स्थनिक नागरिक वंदना भोसले यांनी सांगितले.

Loading Comments