Advertisement

नारद पत्रकारिता पुरस्काराने पत्रकारांचा गौरव


नारद पत्रकारिता पुरस्काराने पत्रकारांचा गौरव
SHARES

विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने आद्य वार्ताहर देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबर येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकारितेतील विशेष कारकीर्द पुरस्काराने दैनिक सामनाचे पत्रकार अतुल जोशी, शुभांगी खापरे यांना गौरवण्यात आले. तर छायाचित्रकार पुरस्काराने छायाचित्रकार श्रीराम वेर्णेकर यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, भालचंद्र दिवाडकर यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार ज्योती अंबेकर यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामगिरीबाबत गौरवण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्योती अंबेकर म्हणाल्या, इलेक्ट्रॉनिक माध्यमात अनेक तरुण तरुणी ग्लॅमर डोळ्यासमोर ठेऊन स्क्रिनवर दिसण्यासाठी प्रवेश करतात. मात्र प्रत्यक्षात आयत्या वेळी एखाद्या विषयावर लिहायचे झाल्यास त्यांची अवघड अवस्था होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमात येण्यापूर्वी प्रिंट मीडियात काम करणे किती आवश्यक आहे, त्यातून व्यक्तिमत्त्व विकास कसा होत जातो हे कळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा