Advertisement

पाच वर्षांत 49179 आपत्कालीन दुर्घटनेत 987 लोकांचा बळी

मुंबईवर दररोज नवनवीन नैसर्गिक संकट येत असतात. मात्र या संकटातून पुन्हा सावरण्याचं वेगळंच स्पिरीट मुंबईकरांमध्ये नेहमीच पहायला मिळतं. मात्र गेल्या पाच वर्षात मुंबईवर आलेल्या नैसर्गिक संकटामुळे 987 जणांना प्राणाला मुकावं लागलं आहे.

पाच वर्षांत 49179 आपत्कालीन दुर्घटनेत 987 लोकांचा बळी
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर दररोज नवनवीन नैसर्गिक संकट येत असतात. मात्र या संकटातून पुन्हा सावरण्याचं वेगळंच स्पिरीट मुंबईकरांमध्ये नेहमीच पहायला मिळतं. मात्र गेल्या पाच वर्षात मुंबईवर आलेल्या नैसर्गिक संकटामुळे 987 जणांना प्राणाला मुकावं लागलं आहे.


2018 दुर्घटनेत...

2018 च्या जुलै महिन्यापर्यंत मुंबईत एकूण 6730 आपत्कालीन दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये 96 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 75 पुरुष आणि 21 स्त्रियांचा समावेश असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी मागवलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

मुंबई उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या भौगोलिक रचनांमुळे दिवसेंदिवस आप्तकालीन दुर्घटना वाढतच आहे. परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांच्या मृत्यू झाल्यानंतर वाढत्या आप्तकालीन घटनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


पाच वर्षांत इतक्या दुर्घटना

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापनकडे 2013 ते 2018 पर्यंत मुंबईत झालेल्या आपत्कालीन दुर्घटनांची माहिती मागवली होती. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार 2013 ते जुलै 2018 पर्यंत मुंबईत एकूण 49179 आपत्कालीन दुर्घटना घडल्या असूूून त्यामध्येे 3066 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 987 जणांचा मृत्यू झाला आहे.

2017 मध्ये सर्वाधिक आपत्कालिन घटना म्हणजेच 11524 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण 226 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात 105 पुरुष आणि 121 स्त्रियांचा समावेश आहे. तर 2018 च्या जुलै महिन्यापर्यंत एकूण 6730 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यात 96 लोकांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन दुर्घटनेत झाडे, झाडांच्या फांद्या पडणे, दरड कोसळणे, घरांचे भाग, भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, शोर्टसर्किट, गॅस गळती, रस्त्यावर ऑईल पडणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, मॅनहोलमध्ये पडून झालेल्या घटनांची नोंद आहे.


2013 ते जुलै 2018 पर्यंत दुर्घटनेत

  • झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनेत 30 जणांचा मृत्यू
  • दरड कोसळण्याच्या 71 घटना घडल्या असून 7 जणांचा मृत्यू
  • घराची किंवा इमारतीची भिंत कोसळल्याने 234 लोकांचा मृत्यू
  • आगीच्या 20074 घटनांमध्ये 208 लोकांचा मृत्यू
  • गॅस गळतीच्या 1291 घटना झाल्या असून त्यात 7 लोकांचा मृत्यू
  • रस्त्यावर पडलेल्या ऑईलमुळे घडलेल्या अपघातांच्या 1119 घटना घडल्या असून त्यात 22 लोकांचा मृत्यू
  • समुद्रात नाल्यात पडलेल्यांची संख्या 639 इतकी असून त्यात 328 जणांना प्राणाला मुकावे लागलं
  • किरकोळ अपघाताच्या 506 घटना असून त्यात 66 जणांचा मृत्यू
  • मॅनहोलमध्ये पडून 237 पुरुष आणि 91 स्त्रियांचा समावेश



हेही वाचा - 

क्रिस्टल टॉवर आगीप्रकरणी विकासकाला अटक

मुंबईतील ९० टक्के इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा