नवी मुंबईच्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये ३०० गाड्यांची आवक झाली आहे. तसंच, फळांच्या दरात घसरण झाली असून, ग्राहक नसल्याने फळ तशीच असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात संत्रीच्या आवक वाढली असून, संत्री ५००० क्विंटल, सफरचंद १००० क्विंटल, कलिंगड ३००० क्विंटल ,अननस १२०० क्विंटल, द्राक्ष ४५० क्विंटल दाखल झाली आहे.
फळांची किंमत
सध्या बाजारात आवक वाढल्याने फळांच्या दरात घसरण झाली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत घसरण झाली आहे.
बाजार आवारात संत्र्याच्या आवक जास्त झाल्याने पूर्ण मार्केटमध्ये संत्री दिसून येत आहे. संत्र्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून २० ते २५ रुपये किलोदराने विकला जात आहे. तसेच १३० रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात ६० ते ७० रुपये दराने विकला जात आहे. डाळिंब ७० ते १५० रुपये, अननस २० ते ३० रुपये, द्राक्ष ६० ते ८० रुपये, कलिंगड ५ ते ८ रुपये, पपई १० ते १५ रुपये किलोने विकली जात आहे.