Advertisement

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन जून महिन्यात

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी विमानतळाच्या कामाची पाहणी केली.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन जून महिन्यात
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai airport) प्रकल्पाचे उद्घाटन जून महिन्यात होईल, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी जाहीर केले. विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) काम वेगात सुरू असल्याबाबत अदानी यांनी समाधान व्यक्त केले.

अदानी (adani) एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे कार्यकारी मुख्य अभियंता कॅप्टन बी.व्ही.जे.के. शर्मा, एनएमआयए प्रकल्पातील भागीदार कंपन्या आणि अन्य हितसंबंधी संस्थांचे प्रतिनिधी तसेच डॉ. प्रीती अदानी, जीत अदानी, दिवा अदानीही यावेळी उपस्थित होते.

विमानतळामुळे नवी मुंबईचा (Navi Mumbai) औद्याोगिक आणि आर्थिक विकास होणार आहे. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण परिसराला मोठी आर्थिक चालना मिळेल, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला.

विमानतळाची पाहणी केल्यानंतर ‘ट्विटर’ वर त्यांनी जूनमध्ये विमानतळ सुरू होईल, असे स्पष्ट केले. या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा